Home शहरे उस्मानाबाद धक्कादायक : मुलानेच नाकारले पित्यावरील अंतीमसंस्कार

धक्कादायक : मुलानेच नाकारले पित्यावरील अंतीमसंस्कार

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २७ मे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन सर्वत्र आहे. त्याच बरोबर लोकांच्या मनातही भीतीने घर केले आहे. आशा वातावरणात मृतांवर अंतीमसंस्कार करणे जिकिरीचे झाले आहे. अनेक ठिकाणी नातेवाईकांशिवाय प्रशासनानेच परस्पर अंतीमसंस्कार केल्याचे घडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पोटच्या मुलानेच पित्यावर अंतीमसंस्कार करण्याचे नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जिल्ह्यात एका वयोवृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हता. मात्र, त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर परंडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताला दम्याचा आजार होता. उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी ती व्यक्ती मरण पावली. त्यानंतर दोन दिवस वडिलांचा मतदेह ताब्यात घ्यायला मुलाने नकार दिला. मुलाने परंडा पोलिसांत आपण मृतदेहावर अत्यंस्कार करू शकत नाही, असे लिहून दिले. शेवटी दोन दिवस वाट पाहून उस्मानाबाद पालिकेतल्या चार कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.