Home ताज्या बातम्या कोंढवा:53 लाखांच्या सिगारेटस जप्त

कोंढवा:53 लाखांच्या सिगारेटस जप्त

पुणे: घरात देशी विदेशी कंपन्यांच्या सिगारेट्‌सचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक (पूर्व) ने पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल 53 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हरीश पोकाराम चौधरी (वय 26, रा. कोंढवा खुर्द) त्याचे नाव आहे. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम कलम 11 तसेच कोटपा ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा बुद्रुक परिसरात महावीर रेसीडेन्सी मधील एका सदनिकेमध्ये एक व्यक्ती विविध देशी विदेशी कंपन्यांच्या सिगारेट्‌सची तसेच प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करुन विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. यावेळी हरीश चौधरी हा त्याच्या रहात्या घरामध्ये विविध देशी विदेशी कंपनीच्या सिगारेट्‌सची विक्री करीत असल्याचे आढळून आले. पुढील कारवाईसाठी आरोपीस कोंढवा पोलीस ठाण्याच्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.