Home बातम्या आंतरराष्ट्रीय कोरोनानंतर आता पाकिस्तानमधून आलं नवं संकट, कसे करतायत नुकसान, जाणून घ्या

कोरोनानंतर आता पाकिस्तानमधून आलं नवं संकट, कसे करतायत नुकसान, जाणून घ्या

मुंबई: देशात कोरोनाचे संकट सुरू असतानाच आणखी एका संकटाने थैमान घातले आहे. आता टोळधाडीने भारतात थैमान घातले आहे. या टोळधाडीचा प्रकोप पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशांतील पिकांवर दिसून येत आहे. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यातच सगळ्यांना हा प्रश्न सतावतोय की ही टोळधाड नेमकी आली तरी कुठून, जाणून घ्या याबद्दल सर्व काही.

पाकिस्तानातून आली टोळधाड

भारतात गेल्या २० वर्षांपासून टोळधाडीचा कहर सुरू आहे. गेल्या वर्षीही यामुळे देशात बरेच नुकसान झाले होते. टोळधाडीमुळे १९९३मध्ये सर्वाधिक नुकसान केले होते. मात्र यावेळी टोळचे हे प्रमाण प्रचंड आहे. यावेळेस ही टोळधाड पाकिस्तानातून भारतात ही टोळधाड आली आहे. सुरूवातीला पंजाब आणि राजस्थानातील पिकांचे नुकसान केल्यानंतर आता ही टोळधाड झाशी येथे पोहोचली आहे.

जगातील सर्वात धोकादायक

टोळीच्या जगात तब्बल १० हजाराहून अधिक प्रजाती आहेक. मात्र भारतात खासकरून याच्या चार प्रजाती आढळतात. वाळवंटी टोळ, प्रवासी टोळ, मुंबई टोळ आणि झाडावरील टोळ. हिरव्यागार पिकांवर वाळवंटी टोळधाड आल्यास ते अत्यंत धोकादायक ठरू शकते. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाळवंटी टोळ जगातील दहा टक्के लोकसंख्या प्रभावित करू शकतो. याला जगातील सर्वात धोकादायक कीटक मानले जाते.

माणसांना धोका नाही

कृषी तज्ञांच्या मते कोणत्याही प्रकारचे टोळ माणसांना धोका पोहोचवत नाहीत. तसेच त्यांना चावतही नाहीत. हे टोळ केवळ पिके आणि झाडांना आपली शिकार बनवतात. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत लोक हे टोळ चवीने खातात.

असा होतो यांचा उगम

टोळ वाढण्याचे कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात होत असलेला बदल. एक मादी टोळ तीन वेळा अंडी देते. तसेच एका वेळेस ती ९५ ते १५८ अंडी देऊ शकते.

एक वर्ग मीटर परिसरात टोळांचे तब्बल एक हजार अंडी असू शकतात. एका टोळचा जगण्याचा कालावधी तीन ते पाच महिने असतो. नर टोळचा आकार ६० ते ७५ मिमी आणि मादी टोळचा आकार ७० ते ९० मिमी असतो.

ओलाव्याच्या ठिकाणी यांची संख्या वाढते

दिल्लीस्थित यमुना जैवविविधता पार्कचे मोहम्मद फैजल यांच्या माहितीनुसार, वाळवंटी टोळ वाळूमध्ये अंडी देतात मात्र ती फुटल्यानंतर हे टोळ खाण्याच्या शोधात ओलावा असलेल्या ठिकाणी येतात.

१६- ते १९ किमी वेगाने उडतात

वाळवंटी टोळ प्रति तासाला १६ ते १९ किमीच्या वेगाने उडतो. हवेचा वेगही यांचा वेग वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे या टोळचा थवा एका दिवसात २०० किमीचा प्रवास करतात. वन स्क्वेअर किमी परिरात तब्बल चार कोटी टोळ असतात जे एका दिवसांत ३५ हजार लोकांचे पोट भरेल इतके अन्न नासधूस करतात.

किती करतात नुकसान

दोन महिन्यांपूर्वी ही टोळधाड आली होती तेव्हा गुजरात आणि राजस्थानात १.७ लाख हेक्टर क्षेत्रातील तेल बिया, जिरे आणि गहूच्या पिकांना मोठे नुकसान पोहोचवले होते. जर या टोळांवर काही उपाययोजना केली नाही तर आठ हजार कोटी रूपयांची मुगाच्या शेतीचे नुकसान होऊ शकते. भारतात यावर्षी होणाऱ्या एकूण नुकसानीबद्दल अंदाजही लावता येणार नाही.

कसा कमी होईल धोका

टोळधाडीपासून वाचण्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे नियंत्रण आणि मॉनिटरिंग. याशिवाय कीटकनाशकांच्या फवारणीने ही टोळधाड कमी होऊ शकते. मात्र भारतात ही सुविधा कमी होते. याप्रकारचे टोळींची अंडी वाढण्यापासूनच रोखता येतात.