Home शहरे उस्मानाबाद हरभऱ्याची हमीभाव नोंदणी आता १४ जून पर्यंत

हरभऱ्याची हमीभाव नोंदणी आता १४ जून पर्यंत

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २८ मे : किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत चालू हंगामात हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी १ मार्च पासून  नोंदणीं चालू आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१ मे होती. आता त्यात वाढ केल्याने १४ जून पर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत हरभऱ्याची खरेदी हमी भावाने करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हरभरा खरेदीचा नोंदणी कालावधी चौदा दिवसांनी वाढवून तो १४  जून पर्यंत वाढविला आहे. या कालावधीचा सर्व संबंधित शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.