Home बातम्या आंतरराष्ट्रीय .त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प

.त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणावर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु भारताकडून तो प्रस्ताव नाकारण्यात आला.

मात्र, याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात बोललो आहे, परंतु चीनशी झालेल्या वादामुळे ते चांगल्या मूडमध्ये नाहीत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात पुन्हा एकदा बोलणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. भारत-चीन सीमावादावर ठेवलेल्या प्रस्तावासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘आपण या मुद्द्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे, असं ते म्हणाले. मध्यस्थीच्या प्रस्तावाचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसंच मोदी हे या मुद्द्यावर चांगल्या मूडमध्ये नाहीत,’ असं ट्रम्प म्हणाले.

‘भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांची १.४ अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांचं लष्करही ताकदवान आहे.भारत या संपूर्ण प्रकारावरून बिलकुल खुश नाही, तसंच चीनदेखील नाही. जर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन” असं ट्रम्प यावेळी म्हणाले.