कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या

- Advertisement -

कोल्हापूर : सध्या देशासह महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे. अशा कोरोनाच्या महाभयानक महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून डाॅक्टर, आरोग्यसेविका काम करत आहेत. अशातच कोल्हापूरातील शाहूवाडी सावर्डे गावात आरोग्य सेविकेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.

संबंधित आरोग्य सेविकेेचा खून तिच्याच पतीनेच नायलॉन दोरीने गळा आवळून केल्याची घक्कादायक माहिती समोर आली आहे. शैलेजा अरविंद पाटील असे खून झालेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे.
शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे गावातील ही घटना आहे.

कौटुंबिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी केली घटनास्थळी पाहणी केली असून शाहुवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -