दक्ष युवकांनी दिल्या पोलिसांना टॉर्च : दक्षता समितीचा उपक्रम

- Advertisement -

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २९ मे : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढुनये म्हणून स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातील जवानांना टॉर्च भेट देऊन बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील “दक्ष” युवकांनी नवा पायंडा पाडला आहे. बेंबळी दक्षता समिती नावाने सोशल मीडियावर कार्यरत एका समूहाने हा उपक्रम पार पाडला.

सोशल डिस्टन्सिंगसाठी आग्रही राहून लोकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत बेंबळी पोलिस स्टेशनचे सपोनि मुस्तफा शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचे  कार्य उल्लेखनीय आहे. असे दक्षता समितीच्या सदस्यांचे मत आहे. म्हणून आज शुक्रवारी (ता. २९) “बेंबळी दक्षता समिती” या सोशल मीडिया समूहाच्या वतीने बेंबळी पोलिस स्टेशनला सहा टॉर्च भेट देण्यात आल्या.

या वेळी गालिबखान पठाण, अमर कटके, नितीन पाटील, गोवींद पाटील, शाम पाटील, बालाजी माने नंदकुमार मानाळे, रोहीत निकम उपस्थित होते.

- Advertisement -