Home बातम्या खोटी तक्रार करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी,

खोटी तक्रार करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी,

0

खोटी तक्रार करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी, खुलताबाद/ खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी परिसरात 5 ते 6 तास वीज गुल झाली असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याचा राग असल्याने बाजार सावंगी येथील महावितरण’च्या सहाय्यक अभियंत्यांनी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार केली आहे संबंधित अभियंत्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत एकोणतीस अन्वय गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य खुलताबाद तालुका अध्यक्ष मुक्तार उस्मान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिता लावून जाहीर निषेध करून पोलीस स्टेशन खुलताबाद येथे निवेदन देण्यात आले तालुक्यातील सत्य पत्रकारिता करणारे काही पत्रकार असत्य खपून घेणार नाही शोध पत्रकार शोध पत्रिकाच करणार आणि चुकीचे काम करणाऱ्या चे पितळ उघडे पाडणारच मग ते सत्तेतील पक्षाचे असो किंवा नसो ते कोणत्याही प्रवृत्तीचा असो या सर्वांना न जुमानता आपल्या जीवाची व आपल्या कुटुंबाचे पर्वा न करता सत्य लिहिण्याचे काम करतात पण काहीजण मनमानी पद्धतीने चुकीचे काम करत आहे या चुकीच्या कामाची प्रसिद्ध करताच पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा खटाटोप करणाऱ्या व पत्रकाराची मुस्कटदाबी करणाऱ्या विद्युत महावितरण मंडळावर कारवाई करा असे खुलताबाद पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळेस ज्येष्ठ पत्रकार वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर, अण्णा जाधव, अजिनाथ बारगळ, संतोष करपे, नईम शहा, मच्छिंद्र घोरपडे, सलमान खान, गणेश मुराडे, भिकन शहा, इसाक कुरेशी, बसीरुद्दीन, व आदी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते

आैरंगाबाद आजिनाथ बारगळ