Home ताज्या बातम्या म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले सलमान खानचे आभार !

म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले सलमान खानचे आभार !

शफीक शेख :-

मुंबई : सध्याच्या टाळेबंदीमुळे आपल्या पनवेल येथील फार्महाउसवर असलेल्या अभिनेता सलमान खानने फ्रंट लाइन योद्ध्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत मुंबई पुलिसांना हॅण्ड सॅनिटाइजरचे वाटप केले आहे.सलमान खानच्या या कौतुकास्पद पुढाकारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरून त्यांच्या या कामगिरीबद्दल धन्यवाद दिले आहेत.

कोरोना महामारीत अभिनेता सलमान खान पोलीसांच्या मदतीला धावून आला आहे.अभिनेता सलमान खानने मुंबईतील फ्रंट लाइन योद्ध्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.आपल्या पनवेल येथील फार्महाउसवर असलेल्या सलमानने नुकतेच स्वत:चे फ्रेश केअर ब्रँडचे अनावरण केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच स्तरावर सॅनिटायझर्सची वाढती मागणी पाहता,सलमानने उदारतापूर्वक आपल्या फ्रेश ब्रँडचे हॅण्ड सॅनिटाइजर मुंबई पोलीस विभागासाठी मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.या कठिण काळात विविध प्रकारे मदत करणा-या सलमानच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.कोरोनाच्या संकटामुळे सध्या करमणूक क्षेत्रातील काम बंद असल्याने अडचणीत सापडलेल्या काही कलाकारांच्या मदतीसाठी सलमान खानने पुढाकार घेतला होता.

सलमानच्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरून सलमानला धन्यवाद दिले आहेत.युवा सेनेच्या पदाधिका-यांनीही सलमान खानच्या या दयाळू वृत्तीबाबत समाज माध्यमातून आभार व्यक्त केले आहेत.सलमानच्या या उदारता आणि सद्यस्थितिच्या जागरूकतेमुळे पुन्हा एकदा त्याने आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.सलमान सध्या आपल्या पनवेल येथील फार्महाउसवर असून,टाळेबंदीचे नियम पाळून त्याने ही मदत मुंबई पोलीसांपर्यंत पोहोचवली आहे.आपल्या परोपकारी स्वभावामुळे सलमान खानचे लाखों चाहते आहेत. त्याच्या याच कारणामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.