Home गुन्हा सिमेंट व विटाच्या ठोकळ्याने नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील शेलु येथे एकाची हत्या; नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद!

सिमेंट व विटाच्या ठोकळ्याने नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील शेलु येथे एकाची हत्या; नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद!


कर्जत :- शफिक शेख
रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील शेलु गावाचे परीसरात काल एका ४४ वर्षीय उत्तर भारतीय ईसमाची सिमेंट विटांचे सिमेंट व विटाच्या ठोकळ्याने नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील शेलु येथे एकाची हत्या; नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद! निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे, या घटनेने नेरळ परीसरात प्रंचड खळबळ माजली असुन आरोपी विरोधात नेरळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन अद्याप आरोपीस अटक झाली नाही. नेरळ पोलिस या घटनेतील आरोपीचा कसुन शोध घेत आहेत.

याबाबत नेरळ पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील शेलु गावाचा परीसरात काल ३१ मे रोजी ११.३० वाजता ते १ जून रोजी सकाळी ७.३० वाजताचा दरम्यान येथिल गुरुनाथ मसणे यांच्या घराचा गॅलरीत ब्रिजभान यादव वयं ४४ याची हत्या झाल्याची माहीती येथिल पोलिस पाटील मनोज रामदास पाटील यांनी नेरळ पोलिसांना दिली. त्यामुळे नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सध्या शेलु व मुळचा गोरखपुर येथे राहणारा कपिलदेव मुन्ना भारती उर्फ सिंघानिया याने ही हत्या केल्याचे फिर्याद करण्यात आली.

नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील शेलु गावात या घटनेतील मयत व आरोपी यांच्यात ३१ मे रोजीचा रात्री भांडण झाले होते. त्या भांडणाचे राग मनांत धरुन वरील तारखेस वेळी व ठिकाणी आरोपी कपिलदेव भारती उर्फ सिंघानिया याने सिमेंट विटांचे सिमेंट व विटाच्या ठोकळ्याने नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील शेलु येथे एकाची हत्या; नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद! मयताचा चेहऱ्यावर डाव्या बाजुस तसेच नाकावर व हनुवटीवर मारुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले आहे.

दरम्यान या प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजि नंबर ७२/२०२० नुसार भादवि कलम ३०२ अन्वये आरोपी कपिलदेव मुन्ना भारती उर्फ सिंघानिया याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी या हत्या प्रकरणातील आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेचा अधिक तपास कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळचे सहायय्क पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, उपनिरीक्षक तात्या सावंजी हे करीत आहेत. या घटनेने मात्र कर्जत तालुक्यांत खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणातील मयत व आरोपी हे दोन्हीही उत्तर भारतीय असल्याचे समोर आले आहे.