Home ताज्या बातम्या मोटारसायकलीला बांधून रोडवर फरफटत नेले,कुत्र्याचा भयंकर छळ

मोटारसायकलीला बांधून रोडवर फरफटत नेले,कुत्र्याचा भयंकर छळ

दिल्ली: काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ अपलोड करणाऱ्या युवकाबाबत चंद्रपुरातील ‘प्यार फाउंडेशन’ या संस्थेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या युवकाने सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कुत्र्याचे पाय धरून त्याला तलावात फेकतानाचा व्हिडीओ तयार केला होता. व्हिडीओ अपलोड होताच चंद्रपूरकरांनी अमानवीय घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर ‘प्यार फाउंडेशन’च्या तक्रारीनंतर या युवकाने या प्रकरणी माफीनामा दिला होता. दुसरीकडे एका हत्तीणीसोबत देखील विचित्र प्रकार घडला असून केरळच्या मल्लपूरममध्ये गर्भवती हत्तीणीची शिकार करण्यात आली.

देशाच्या राजधानीत ही कुत्र्याचा छळ

दुसरीकडे भारताची राजधानी असणाऱ्या दिल्लीत देखील एका कुत्र्यासोबत छळ करण्यात आला आहे. एका कुत्र्याला गाडीला बांधून रोडवरून फरफटत नेले. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला त्या कुत्र्यावर दया आली आणि त्याने त्याचा जीव वाचवला.

कुत्र्याला सोडून तो व्यक्ती पळाला

आरोपी व्यक्ती दोरीने बांधलेल्या कुत्राला खेचत होता. रस्त्याने जाणार्‍या एका स्थानिक व्यक्तीने हे भयंकर कृत्य पाहिलं. ज्यानंतर त्याने त्या व्यक्तीला थांबवून या प्रकाराबाबत बरंच सुनावलं. त्यानंतर तो व्यक्ती घाबरून गाडीला बांधलेली कुत्र्याची दोरी कापून पळून गेला.

कुत्र्यावर प्रेम करणारे (डॉग लवर) आणि डिजिटल मार्केटर अभिषेक जोशी यांनी पीडित कुत्र्याची छायाचित्रे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तसेच घडलेल्या घटनेचा तपशील शेअर केला आहे. जोशी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की कुत्र्याच्या जखमांवर उपचार केले जात आहेत. कृपया कोणीही तिला दत्तक घेण्यास किंवा तिचे पालन पोषण करण्यासाठी तिला घरी नेऊ शकता.

सदर कुत्र्याचे वय २ ते ६ वर्षे

पुढे जोशी म्हणाले की, सदर कुत्र्याला संजय गांधी शेल्टरमध्ये ठेवण्यात आले आहे. कुत्रा स्वीकारण्यास किंवा पाळण्यास इच्छुक असलेले लोक त्यांनी दिलेल्या फोन क्रमांकावरती संपर्क साधू शकतात त्यांनी फोन नंबर देखील सार्वजनिक केला आहे. जोशी यांच्यानुसार कुत्रा २ ते ६ वर्षांचा असून तो ल्हासा किंवा पोमेरेनियन असू शकतो. जोशी म्हणाले की, आरोपींच्या वाहनाच्या नोट नंबरचा कोणी विचार केला नाही. संजय गांधी अ‍ॅनिमल केअर सेंटर, राजा गार्डन, नवी दिल्ली यांना कुणीतरी माहिती दिली आणि त्यानंतर घटनास्थळी एक रुग्णवाहिका पाठविण्यात आली. त्यानंतर जखमी झालेल्या कुत्र्याला आश्रयाला आणले आहे.