Home शहरे उस्मानाबाद राज्यमंत्री बनसोडे यांचा आज उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा

राज्यमंत्री बनसोडे यांचा आज उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ५ जून : पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवारी ५ जून रोजी सकाळी ११:३० वाजता उदगीरहुन निलंगा कासारशिरसी मार्गे उमरगा (जिल्हा उस्मानाबाद) कडे प्रयाण. दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह उमरगा येथे आगमन व राखीव. कोरोना सद्यस्थिती, पाणी टंचाई, रोजगार हमी योजनाबाबत उपविभागीय अधिकारी, उमरगा व तहसिलदार उमरगा यांच्या समवेत आढावा बैठक. दुपारी २ वाजता उमरग्याहुन किल्लारी औसा मार्गे लातूरकडे प्रयाण.