Home ताज्या बातम्या 35 दिवसाच्या बाळाला घेऊन 400 किमीचा प्रवास करणाऱ्या मातेसाठी तो पोलीस बनला देवदूत.

35 दिवसाच्या बाळाला घेऊन 400 किमीचा प्रवास करणाऱ्या मातेसाठी तो पोलीस बनला देवदूत.

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” असे म्हंटले जाते. याचा साक्षात्कार सुरत येथून आपल्या 35 दिवसाच्या बाळाला घेऊन 400 किमीचा प्रवास करत चालत रावेर ला दाखल झालेल्या मातेच्या रुपात घडला. सुरत येथे मोलमजुरी करून एक कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असताना अचानक लोकडाऊन मुळे सर्वच बंद झाले. मोलमजुरी नसल्याने दोन वेळच्या भाकरीने घरचा रस्ता दाखवला. मध्य प्रदेशातील रिवा गावापर्यंत 1200 किमी चे अंतर पायी तुडवून गाव गाठण्याची जिद्द उराशी बाळगून दोन वर्षांचा मुलगा, पती आणि 35 दिवसाची बाळंतीण 45 अंश उन्हात पायीच प्रवास करत निघाली होती. ती रावेर मध्ये आली असता तेथे रावेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार हिच्या रुपात तिला जणू देवदूत च भेटला. त्यांची अवस्था पाहून निलेश लोहार यांचे मन सुन्न झाले. देवावरती अफाट श्रद्धा असणाऱ्या पोलीस निलेश लोहार यांने त्यांच्या जेवणाची, कपड्यांची, चपलांची व्यवस्था करून यापुढे ते 800 किमीचा प्रवास चालत कसा पूर्ण करणार या विचाराने पोलीस निलेश लोहार यांनी त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करून प्रवासात गरज भासेल या करिता त्यांना 2000 रुपये मदत केली. तसेच लोकडाऊन च्या काळात निलेश लोहार यांनी परप्रांतीय मजुरांना 600 नवीन चप्पल जोड, भाजी पोळी, ग्लुकोज पावडर, पेनकिलर गोळ्या, लहान मुलांना कपडे, बिस्किटे, चिवडा, कुरकुरे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील या योद्धयाला सलाम🙏

🇮🇳🇮🇳 #जयहिंद 🇮🇳🇮🇳
महाराष्ट्र पोलीस वर्दीतला माणूस