Home बातम्या आंतरराष्ट्रीय अरे देवा! ब्रेन सर्जरी सुरू असतानाच अचानक रुग्णाला आली जाग आणि…

अरे देवा! ब्रेन सर्जरी सुरू असतानाच अचानक रुग्णाला आली जाग आणि…

अँकोना: ऑपरेशन दरम्यान रुग्णांना भुलीचं इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळं रुग्ण बेशुद्ध असतात. पण एका महिला अचानक ब्रेन सर्जरी करताना अचानक जागी झाली. हा घटनेनं डॉक्टरही हादरले. मुख्य म्हणजे ही रुग्ण जागी झाल्यानंतर चक्क भज्या तळायला लागली. मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान पारंपारिक इटालियन ऑलिव्ह भज्या करायला लागली. अडीच तासाच्या सर्जरीमध्ये या महिलेने चक्क 90 प्रकारच्या भज्या केल्या. इटलीमध्ये या पकोलांना अॅपरिटिफ (Aperitifs) म्हणतात.इटलीच्या अँकोना येथे 60 वर्षांच्या महिलेला मेंदूचा विकार होता. ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. पण डॉक्टरांनी या रुग्णाला भुलीचं कमी प्रमाणाचं इंजेक्शन दिलं. त्यामुळं सर्जरी करताना या रुग्णाला अचानक जागी झाली. त्यानंतर या महिलेला भीती वाटू नये, म्हणून तिला भज्या तळण्यास सांगितले. इटलीमध्ये अशी प्रथा आहे की भीती घालवण्यासाठी अशा काही युक्त्या कराव्या लागतात. अझिंडा ओस्पेदाली रियुनिटी हॉस्पिटलच्या न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. रॉबर्टो त्रिगणी यांनी हे ऑपरेशन केलं. त्यानी या महिलेला सांगितलं की आम्ही ऑपरेशन दरम्यान जागं केलं.अडीच तासाच्या ऑपरेशन दरम्यान या महिलेने ऑलिव्ह अपेरिफ्स म्हणजे भज्या तळायला सुरुवात केली. डॉक्टर त्रिगानी म्हणाले की, आमची टीमही रुग्णासोबत भज्या तळत होते. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये रुग्णाला बहुधा अर्धांगवायूचा झटका येतो. त्यामुळं त्यांना मध्ये जागे करावे लागते.यापूर्वी लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान 53 वर्षीय डॅगमार टर्नरने व्हायोलिन वाजवत होती. तिचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.