Home ताज्या बातम्या महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसात मान्सून होणार सक्रिय

महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसात मान्सून होणार सक्रिय

मुंबई :-शफीक शेख

पुढच्या काही तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रात गोवा, कोकण किनारपट्टीमार्गे प्रवेश करत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढचे चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.

सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील चार दिवस म्हणजे ११ ते १४ जून या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्राची उन्हाळ्यापासून सुटका केली आहे. अजूनही मान्सून दाखल होण्याआधी मुंबईत पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. नांदेड, हिंगोली या ठिकाणीही दमदार पाऊस झाला आहे. मुंबईतील दादर, मांटुंगा, कुलाबा, मालाड, कांदिवली या ठिकाणी पावसाने हजेरी लावली