Home गुन्हा 86 कोटी 5 लाख 75 हजार रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

86 कोटी 5 लाख 75 हजार रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे :- पुण्यातील विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील बंगल्यातून एकूण 86 कोटी 5 लाख 75 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अटक आरोपींचे मोठे रॅकेट असून लष्करातील लान्स नायक हाच मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जप्त करण्यात आलेली रक्कम ही मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री उशिरापर्यंत तिची मोजणी सुरू होती. शेख अलिम समद गुलाब खान रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा असे या लान्स नाईकचे नाव असून तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी कार्यरत आहे. लष्करात काम करणाऱ्या अलिम सह त्याचे सहकारी आरोपी सुनिल बद्रीनारायण सारडा, अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान, अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान, रितेश रत्नाकर आणि तुफेल अहमद महमद इशोक खान यांना अटक करण्यात आली आहे.

लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही रक्कम, पाच मोबाइल, रोख दोन लाख 89 हजार रुपये, एक हजार 200 अमेरिकन डॉलर, चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या 13 नोटा, एक कार आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या चलनामध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. त्यांच्यावर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे नमूद आहे. नोटा ठेवण्यात आल्या होत्या.

त्या बंगल्याच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत. संबंधित नोटा बंगल्यात का ठेवल्या होत्या? त्या कोणाकडून आणल्यात आल्या? त्याची छपाई कुठे करण्यात आली? या नोटांद्वारे व्यवहार करून आरोपींनी कोणाला फसवले आहे का? टोळीत अजून कोणाचा सहभाग आहे का? तसेच मुख्य सूत्रधार खान याचा या गुन्ह्यामागील उद्देश काय आहे? याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी आरोपींची 15 जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.