आज कोविड19 संसर्गजन्य विषाणू निर्मूलन विरुद्धच्या लढ्यात जागतिक लॉक डाउन च्या काळामध्ये अनेक सुशिक्षित आणि अशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नोकरी गेल्या तसेच व्यवसाय ठप्प झालेत एकंदरीत या गोरगरीब मजुरांचा पैसा संपला, त्यामुळे कित्येक बांधवांच्या घरामध्ये अन्नपाणी नाहीये, तरीसुद्धा मित्रांनो खचून जाऊ नका.
जर तुम्हांला कंपनी कामावरून कमी करत असेल किंवा तुमचे मासिक वेतन कापत असेल किंवा देत नसतील तर माझ्या खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. त्यांना आम्ही टा.ग्रुप युवा रोजगार संघटनेच्या वतीने जाब विचारू.
कर्मचाऱ्यांचे कसल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान किंवा दबाव आणून मानसिक खच्चीकरण तसेच गळचेपी करण्याचा अधिकार कोणत्याही कंपनीला नाही. याउलट कर्मचाऱ्यांच्या हिताची पत्र आणि आदेश राज्य व केंद्र सरकार आणि कामगार आयुक्तालय यांनी जाहीर केले आहेत, तरीसुद्धा तुम्ही स्वतः कंपनीच्या दबावाखाली येऊन कसल्याही प्रकारचा राजीनामा लेखी स्वरूपात कंपनीला देऊ नका त्यांना स्पष्ट नकार द्या. जर ते कामावरून टर्मिनेट करत असतील तर ते पत्र त्यांना ईमेलवर किंवा त्यांच्या लेटरहेडवर हार्ड कॉपी मागून घ्या आणि त्याच्या एकनॉलेजमेंट कॉपी वर कसल्याही प्रकारची स्वाक्षरी करू नका, जरी केली तरी (मी माझे विसार राखून ठेवतो) असे नमूद करावे. कंपनीतील व्यवस्थापना विरुद्ध तुम्ही कामगार न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागु शकता, आणि जास्तीत जास्त निकाल हे कामगारांच्या बाजूनेच लागतात. कायदेशीर तरतुदींनुसार आमच्या कायदेतज्ञ समन्वयक समितीकडून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. जर आज तुमच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढला नाही तर, तुमच्या नंतर अनेक निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी या बलाढ्य कंपन्या घेत राहतील.
आम्ही मागील कित्येक वर्षांपासून तुमच्या मदतीसाठी, समाजसेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
या गंभीर आणि वाईट परिस्थितीत सुद्धा स्वतःच्या जीवाची कसल्याही प्रकारची पर्वा न करता, आम्ही बऱ्याचशा गोरगरीब जनतेपर्यंत अन्नदान वस्त्रदान, मास्क व मास्कशिल्ड वाटप तसेच पोलीस प्रशासन डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, काही विभागात सॅनिटायजर फवारणी, पशूंना खाद्य, व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञान विषयक माहिती आणि मार्गदर्शन, परराज्यात पायी जाणाऱ्या वाटसरूंना अन्नदान व लिफ्ट दिली, अपघात ठिकाणी मदत, रुग्णांचे रुग्णालयातील बिल कमी करणे, तसेच कुस्ती प्रेमींना ऑनलाइन मल्लविद्या विषयी मार्गदर्शन अशाप्रकारे होईल तेवढी निस्वार्थ मदत प्रत्येक जिल्हानिहाय, राज्य आणि राज्याच्या बाहेर समाज उपयोगी कार्य चालूच आहे. आणि यांमधील टायगर ग्रुप च्या प्रत्येक सदस्याचा खारीचा वाटा आहे.
स्वतःची काळजी घेत प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून, समाजसेवा करत असताना सुद्धा काही मित्रांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झालाच त्यातून सुद्धा त्यांनी धीर न सोडता विलगीकरण कक्षात राहून बरे झालेत तर काही सगळ्या मित्र परिवाराला आणि स्वतःच्या कुटुंबाला कायमचे सोडून गेले. त्यांची अपार समाजसेवा विषयीचे प्रेम त्यांच्या या बांधिलकीचा गाडा आम्ही अमरण चालूच ठेवणार.
आम्ही अनेक गरजू बांधवांपर्यंत स्वतःहून सोशल मीडिया, दूरध्वनीवरून तसेच थेट वेगवेगळ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये भेट देऊन विद्यार्थी वर्ग तसेच बेरोजगार युवक-युवतीं त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांना समाधानकारक प्रोत्साहन देऊन या सुशिक्षित आणि अशिक्षित युवक-युवतींसाठी त्यांच्या शिक्षण, कला आणि क्षमतेनुसार नुसार या आपल्या बांधवांना विविध उल्लेखनीय क्षेत्रांमध्ये रोजगारांची संधी उपलब्ध करून देत आहोत, तसेच व्यवसायसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि मदत करत आहोत आणि करत राहणार तेही विनामूल्य.
टीप:- प्रशासनाच्या संचार बंदी तसेच फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून बाहेर गावा वरून शहराकडे येणाऱ्या युवक-युवतींना, मजुरांना खाण्यापिण्याच्या आणि राहण्यासाठी इतर सुखसोई सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे निश्चिंत रहा.
आपल्या गाव, तालुका, जिल्हानिहाय समाजसेवा करणारे टायगर ग्रुप सदस्य किंवा पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधा. बांधवांनो कसल्याही भूल, थापा आणि आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका. काही शंका असल्यास खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा तसेच तुमचा बायोडाटा व्हाॅट्सअप करा.
आपला विश्वासू,
श्री.विक्रम गायकवाड ( अध्यक्ष टायगर ग्रुप युवा रोजगार महाराष्ट्र प्रदेश) 8888882112
गौरव चव्हाण ( सदस्य टायगर ग्रुप युवा रोजगार महाराष्ट्र) 8956671117
टायगर ग्रुप युवा रोजगार, इंडिया