दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख
पुणे, १३ जून : श्रीमंत महिला व आयटी कंपनीत चांगल्या
पगारावर नोकरी करणाऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर
बदनामीची धमकी देणाऱ्या गुन्हेगारास युनिट ५ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडून १ करोड ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्यामध्ये मागील १ वर्षापासून सदर
महिलेशी पूर्वीच्या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन अब्रुनुकसानीची धमकी देऊन १ कोटी ७४ लाख रुपयांची चोरी अनिकेत बुबणे (वय ३०, रा. धनकवडी) या आरोपीने केली होती. चोरी केल्यापासून सदर आरोपी १ वर्षापासून फरार होता. सदर आरोपी कुठलाही पुरावा मिळणार नाही, याची काळजी घेत असल्याने तो पोलिसांना सापडण्यास अडचणी येत होत्या.
युनिट ५ चे सहायक पोलीस निरीक्षक तासगांवकर व हवालदार रणसिंग
यांनी तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास करून आरोपीच्या सर्व मैत्रीणीना भेटून त्यांना विश्वासात घेऊन आरोपीचे खरे रूप सांगितले. याचा फायदा झाला व आरोपीने त्याच्या जुन्या मैत्रिणीशी संपर्क केल्यावर तो कुठे आहे ते समजले. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी २ टिम तयार करून आरोपीस त्याच्या मैत्रिणीमार्फत बाणेर येथे बोलावले व १३ जून रोजी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९८,१०,५००/- रोख गुन्ह्यात वापरलेली डस्टर कार व इतर मुद्देमाल १,०८,३०,५००/- चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीने अनेक मुलींना व महिलांना फसवले असल्याने पिडीत महिला व मुलींनी प्रशासनाला मदत करून पोलिसात तक्रार करावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर कारवाई गुन्हेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस स्टाफ प्रदीप सुर्वे, संतोष मोहिते, दत्ता काटम, प्रवीण शिंदे, राजेश रणसिंग, अमजद पठाण, सचिन घोलप, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, अश्रुबा मोराळे, प्रमोद घाडगे, दया शेगर, सतिश वणवे, अंकुश जोगदंडे, प्रमोद गायकवाड, संजयकुमार दळवी, महिला पोलीस शिपाई स्नेहल जाधव यांनी केली आहे.