Home बातम्या आंतरराष्ट्रीय News:155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेतील तब्बल सव्वा लाख नागरिकांना दिला रोजगार

News:155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेतील तब्बल सव्वा लाख नागरिकांना दिला रोजगार

अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे व ते अमेरिकेतील लाखो नागरिकांना रोजगार पूरवित आहेत

नवी दिल्ली : तब्बल 155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेमध्ये 2200 कोटी डॉलरची (सुमारे 1.67 लाख कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. यामुळे तेथे 1,25,000 लोकांना रोजगार मिळाला आहे.कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीडच्या (सीआयआय) ताज्या अहवालात ही माहिती मिळाली आहे. सीआयआयच्या ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉइल 2020’ च्या अहवालानुसार अमेरिकेतील वॉशिंग्टन, डीसी आणि पोर्टो रिको यांच्यासह 50 राज्यात गुंतवणूक केली आहे. परिणामी मोठ्या संख्येने नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.या अहवालात असेही म्हटले आहे की टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामध्ये सर्वाधिक कामगार राहतात. ज्यांना भारतीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. सिनेट इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष आणि सिनेटचे सदस्य जॉन कॉर्नन म्हणाले, “भारतीय वंशांच्या अमेरिकन लोकांनी आमच्या देशातील संस्कृती, अर्थव्यवस्था आणि विज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि टेक्सास आपल्या मेहनतीचा आणि नाविन्याचं कौतुक करतो.” म्हणून चांगले कार्य सुरू ठेवा! ‘