जन्मदात्या पित्याच्या दोरीने बांधव शस्त्राने वार करत खून

- Advertisement -

जन्मदात्या पित्याच्या दोरीने बांधव शस्त्राने वार करत खून

पुणे : परवेज शेख

दापोडी,पुणे – जन्मदात्या वृद्ध पित्याला दोरीने बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना दापोडी येथे मंगळवारी (दि.१६) घडली. संपत्ती व पैशाच्या कारणावरून हा प्रकार झाला आहे.

सुनील मुतय्या पोलकम (वय ६८, रा. भाटिया चाळ, दापोडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा राजेश सुनील पोलकम (वय ३८, रा. इंद्रायणीनगर, दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी योगेश रमेश येवले (वय ३५, रा. सुंदरबाग कॉलनी, दापोडी) यांनी बुधवारी (दि.१७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेनंतर तब्बल दीड दिवसांनी याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश आणि त्याचे वडील सुनील यांच्यात नेहमी संपत्ती व पैशाच्या कारणावरून भांडण होत होते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झाले.

या भांडणात आरोपी राजेश याने त्याच्या वडिलांना दोरीने बांधले. त्यानंतर आरोपीने वडिलांवर धारदार शस्त्राने वार केला. हा प्रकार सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होता.

दरम्यान जखमी झालेल्या सुनील यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisement -