Home ताज्या बातम्या दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. “इयत्ता बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागेल”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

‘लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाला, तर पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. आमचा प्रयत्न होता लवकरात लवकर निकाल लावण्याचा, मात्र तरीदेखील बारावीचा निकाल जुलै 15 पर्यंत आणि दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो, पेपर तपासणीचं काम सध्या सुरु आहे. ते लवकर झालं तर आणखी लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न आहे’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

11 वी प्रवेशाबाबत ऑनलाईन प्रक्रिया करून ती सोप्या पद्धतीने करणार आहे. ऑनलाईन शिक्षणाबाबत पालकांच्या अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.