Home ताज्या बातम्या ‘ठाकरे सरकार’ चा ब्रेक…फडणवीसांनी जाहीर केलेल्या मेगाभरतील

‘ठाकरे सरकार’ चा ब्रेक…फडणवीसांनी जाहीर केलेल्या मेगाभरतील

मुंबई :-

तत्कालीन फडणवीस सरकारने घोषित केलेली शासकीय मेगाभरती कोरोनामुळे आता पुन्हा लांबणीवर पडली आहे. राज्याच्या तिजोरीत दरमहा सरासरी 26 हजार कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित असतानाही एप्रिल व मे महिन्यात अवघा 13 हजार कोटींचा महसूल जमा झाला. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने खर्चावर नियंत्रण आणले असून आरोग्य विभागाशिवाय कोणत्याही विभागांची पदभरती होणार नसल्याने स्पष्ट केले आहे.

बाहेरून आलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

राज्य सरकारने 2020-21 मध्ये तीन लाख नऊ हजार कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाचे उद्दिष्टे ठेवले आहे. मात्र, मागील अडीच महिन्यात सरकारला अपेक्षित महसूल मिळालेला नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढल्याने सरकारने नव्या पदभरतीला ब्रेक लावला आहे. परंतु, राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेत राज्य सरकार पुढील वर्षी एक लाख पदांची मेगाभरती करण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महाआयटीतर्फे खासगी संस्था नियुक्‍तीची कार्यवाही सुरुच ठेवली आहे.

सैराट मुळे चर्चेत आलेल्या करमाळ्याच्या कमला भवानीच्या मंदिराला आहे मोठा ऐतिहासिक वारसा

दरम्यान, राज्य सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये सुमारे 16 लाख अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या नऊ लाखांपर्यंत आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीतून दरमहा 12 हजार कोटी रुपये द्यावे लागतात, अशी माहिती वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल यांनी दिली.