Home ताज्या बातम्या व्हॉट्स अपमध्ये ऑनलाईन, लास्ट सीन, प्रायव्हसी सेटिंग, स्टेटस यामध्ये गडबड

व्हॉट्स अपमध्ये ऑनलाईन, लास्ट सीन, प्रायव्हसी सेटिंग, स्टेटस यामध्ये गडबड

0

पुणे :  सोशल मिडीयातील मेसेजिंगचे जगातील लोकप्रिय अ‍ॅप व्हॉट्स अप मागील काही तासांपासून डाऊन झाले आहे. व्हॉट्स अपमध्ये ऑनलाईन, लास्ट सीन, प्रायव्हसी सेटिंग, स्टेटस यामध्ये गडबड झाली असल्याची अनेक भारतीय नेटकर्यांनी सोशल मिडीयात तक्रार केली आहे.

           व्हॉट्स अप मध्ये गडबड होण्याचे नेमके कारण समजू शकले नाहीये. पण सध्या समोरची व्यक्ती ऑनलाईन आहे की नाही हे दिसू शकत नाहीये. लास्ट सीनचा पर्यायही काम करत नाहीये. प्रायव्हसी सेटिंगमध्ये गडबड झाली आहे. करोडो भारतीय नेटकरी यामुळे गोंधळलेले आहेत. कंपनीने याबाबतीत आत्तापर्यंत कोणतीही सुचना दिलेली नसून नक्की काय झाले आहे, हे कळायला वेळ लागेल एवढं नक्की.