Home ताज्या बातम्या दूध उत्पादक व ग्रामस्थ यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख 11 हजार 111 रुपयांची मदत

दूध उत्पादक व ग्रामस्थ यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख 11 हजार 111 रुपयांची मदत

कर्जत -तालुक्‍यातील टाकळी खंडेश्‍वरी येथील अरुणोदय दूध उत्पादक व ग्रामस्थ यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख 11 हजार 111 रुपयांची मदत करण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे दूध उत्पादक व ग्रामस्थ यांनी हा धनादेश सुपूर्द केला.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महानंदाचे अध्यक्ष रणजित देशमुख, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ही मदत देण्यात आलेली आहे. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, प्रवीण घुले, ऍड. कैलास शेवाळे, संतोष म्हेत्रे, किशोर तापकीर, बाळासाहेब सपकाळ, दत्ता डुबल, सागर ढोबेंच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. किरण पाटील म्हणाले, गावातील थापलिंग रस्त्याचे उर्वरित डांबरीकरण काम करून देण्याचे आमदार पवार यांनी मान्य केले आहे. माहिजळगाव व टाकळी येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विद्युत उपकेंद्र उभारावे.