डेहराडून : कोरोनावर प्रभावी औषध आणल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीच्या समस्येत आता अधिक वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या नोटीसीनंतर आता उत्तराखंड सरकारकडूनही दिव्य योग फार्मेसीला नोटीस बजावण्यात आली आहे. खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता, कोरोनाचं औषध बनवण्यासाठी परवानगी मिळाली कशी?, अशी विचारणा पतंजलीला राज्याच्या आयुर्वेद विभागाकडून करण्यात आली आहे.
राज्याच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीला इम्युनिटी बुस्टर, सर्दी-खोकला तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता. त्यात कोरोनाव्हायरसचा उल्लेख नव्हता.
As per Patanjali's application, we issued them license. They didn't mention coronavirus, we only approved license for immunity booster, cough & fever. We'll issue them a notice asking how they got permission to make the kit (for COVID19): Licence Officer, Uttarakhand Ayurved Dept pic.twitter.com/I7CWKoJhbK
— ANI (@ANI) June 24, 2020