Home ताज्या बातम्या धक्कादायक ! कोरोनानंतर मुंबईत पोहोचला ‘हा’ आजार; 231 रुग्ण दाखल, 31 मृत्यू

धक्कादायक ! कोरोनानंतर मुंबईत पोहोचला ‘हा’ आजार; 231 रुग्ण दाखल, 31 मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला. त्याचे लक्षणीय प्रमाण मुंबईत होते. परंतु आता मुंबईत कोरोनाचे संक्रमणाच्या वृद्धीत थोडीशी घट जाणवत असल्याने दिलासादायक वातावरण तयार झाले होते.

परंतु आता आणखी एक आजार मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन ठेपला आहे. आता पर्यंत स्व. इंदिरा गांधी कोविड -19 शासकीय रुग्णालयात सारी आजाराचे 231 रुग्ण दाखल झाले त्यापैकी 31 जणां चा मृत्यू झाला आहे.

तर 190 कोरोनाबाधित दाखल होऊन त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयजीएम या रुग्णालयातही 2 डॉक्टर्स ,

7 परिचारिका ,2 रुग्णवाहिका चालक व 4 कर्मचारी अशा रुग्णालयातील 15 जणांना कोरोना बाधा झाल्याने येथील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात येथील व्यवस्था कमी पडत असून त्याकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी करण्यात येत आहे.