दर्शन पोलिस टाइम – संपादक (अनुप फंड)
दिनांक ०८/०६/२०२० रोजी दुपारी ०४:३० वाजता ज्येष्ठ महिला नावे मंगला मुरली राहणार मधुबन सोसायटी, कळस ,पुणे या त्यांचे एक्टिवा गाडी वरून मुलीला भेटण्यासाठी चेस्टरफील्ड सोसायटीकडे धानोरी गावठाणा कडून जात असताना त्यांचे पाठीमागून आलेल्या मोटर सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची किंमत अंदाजे ५० हजार रुपये जबरदस्तीने हिसकामारून डोंगराच्या दिशेनेपळून गेले त्याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं ५७३/२०२० भा.द.वि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल जबरी चैन चोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कदम (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे इन्चार्ज व स्टाफ हे करत होते. त्यांनी दाखल गुन्ह्याचे घटनास्थळी, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सांगितलेल्या वर्णनावरून जबरी चोरी करणारे इसमांनी वापरलेल्या काळ्या रंगाच्या मोटर सायकलचा व अनोळखी इसमाचा ते गेलेले व आलेल्या मार्गाचा अभ्यास करून त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा पो.ना. प्रवीण भालचीम व पो.शि. प्रफुल मोरे यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून कसोशीने अहोरात्र तपास व आरोपींचा माग काढून तांत्रिक साधनाचा वापर करून केलेले तपासामध्ये सदर आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये घटनास्थळी येत असताना ची प्राथमिक माहिती फुटेजद्वारे प्राप्त झाली म्हणून त्यांनी आरोपी आलेल्या मार्गाचा शेवटपर्यंत शोध घेतला असता आरोपी हे भारत ढाबा चौकातून धानोरी रोडने फिर्यादीच्या मागे येत असतानाचे फुटेज प्राप्त झाले. म्हणून त्यांनी आरोपी आलेल्या मार्गाचा तपास केला असता आरोपी हे खराडी बायपास-एम्प्रेस गार्डन-पुणे स्टेशन-जहांगीर चौक-आरटीओ चौक – पर्णकुटी चौक-चंद्रमा चौक-विश्रांतवाडी चौक- कसूर बाग सोसायटी-विश्रांतवाडी चौकातून-संभाजी चौक कळस – विश्रांतवाडी चौकातून धानोरी असे येतानाचे फुटेज प्राप्त झाले. त्या अनुषंगाने त्यांच्या खराडी /वाघोली भागात शोध घेत असताना फुटेजमध्ये आरोपींनी वापरलेल्या गाडीचा नंबर एम एच१६ बीडी३४२१ असा मिळून आला म्हणून सदर गाडी एन.पी.आर कॅमेरा खराडी बायपास रोड ला येताना दिसली तिचा वाघोली परिसरात शोध घेतला असता ती वाघेश्वर मंदिराजवळ रोडला पार्क केलेली मिळाली. गाडी मिळल्यानंतर आरोपी याच भागातील असल्याचे खात्री झाल्याने आम्ही तपास पथकाच्या टीम पाडून सदर गाडीवरती पाळत ठेवली होती. परंतु चाणाक्ष आरोपीने ती साथीदार आरोपीच्या मदतीने रात्री अचानक काठे कुठेतरी घेऊन गेला परंतु त्याच जागेवर होंडा लिओ एम.एच.२९ ए.यू. ६४८४ ही गाडी सोडलेली होती तिची माहिती काढली असता ती उमरखेड पोलिस स्टेशन यवतमाळ येथून चोरीस गेल्या चा गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.त्यामुळे आरोपी दोन्ही गाड्यांचा वापर करत असल्याचा संशय आला त्या दोन्ही गाड्यांचा तपास पथक टीम शोध घेत असताना पोलीस नाईक ३८६४ प्रवीण भालचीम व पो. शि.९०८९ मोरे यांना गाडी होंडा ड्रीम युवा एम एच १६ बीडी ३४२१हिचेवर चैन चोरीच्या गुन्ह्यातील पूर्व रेकॉर्ड वरील आरोपी विक्रम पांडे हार रयश ड्रायव्हिंग करत नगर रोडणे खांदवे नगर कडे जात असताना दिसला त्यांनी सोबतचे सर्व स्टाफला बोलावून त्या गाडीचा खांदवे नगर भागात दोन दिवस शोध घेतला ती एका मैदानात उभी असल्याची दिसली तिथे जवळ होंडा लिओ एम.एच.२९ ए.यू. ६४८४ मोटारसायकल देखील लावल्याचे दिसली आरोपी त्या दोन्ही गाड्यांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्याने तपास पथक टीमने गुप्तपणे तीन रचून थाब्ले असता काळ दि. २५/०६/२०२० रोजी विक्रम पांडे हा गाडी घेण्यासाठी येताना दिसला त्यावेळी तपास टीममधील पोनो भालचीम यांनी त्यास ओळखुन इशारा केल्यानंतर त्यास पडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करून लागला म्हणून त्याचा पाठला करून व त्याने वापरलेल्या दोन्ही गाड्या ताब्यात घेतलाय व त्या गुन्हेयाचे तपास कमी जप्त केल्या असून ,आरोपी विक्रम सूर्य नारायण पांडे वय ३५ राहणार जिने स्कूल जवळ, कवाडे वस्ती ,वाघोली,पुणे यास अटक करूनत्याचे साथीदार आरोपी विक्रम जाधव वय ३५ रा.वाघोली,पुणे याचा शोध घेऊ देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपींनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली फिर्यादीची सोन्याची चैन जप्तकरण्यात आलेली आहे.दाखल गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि निकम हे वरिष्ट अधिकाऱ्यांचा मार्गदर्शना खाली करत आहे करत आहे. तसेच आरोपींनी आणखी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहेत याबाबत अधिक तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. श्री सुनील फुलारी, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा.श्री पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४, मा. श्री लक्ष्मण बोराटे, सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, मा. श्री अरुण आव्हाड .वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी तसेच रवींद्र कदम पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन निकम व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते व कर्मचारी विजय सावंत, प्रवीण भालचीम, यशवंत किर्वे, किशोर दुशिंग, अझरुद्दीन पठाण, प्रफुल मोरे, रिहान पठाण, शेखर खराडे, संदीप देवकाते, अनिकेत भिंगारे व विशेष पोलीस अधिकारी राज राठोड (पी-४) यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला कृपया सबस्क्राईब करा.
फेसबुक वर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.