Home ताज्या बातम्या पी-४ मधील सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित !!

पी-४ मधील सुरक्षा एजेन्सीच्या मालकांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित !!

पुणे :- प्रतिनिधी

पी-४ फाउंडेशन चे मुख्य समन्वयक आणि विशेष पोलीस अधिकारी तसेच रिलायबल एच आर प्रा.ली चे मा.राज राठोड व एमबीआर प्रा.ली चे मा.दिनेश रायकवार यांना विश्रांतवाडी पो.स्टे चे व.पो.नि अरुण आव्हाड साहेब व पो.नि रवींद्र कदम साहेब यांच्या हस्ते कोविड मध्ये सलग ३ महिने कर्तव्य केल्याबद्दल कोविड योद्धा म्हणून सन्मानीत करण्यात आले.


कोरोना संकटात पोलिसांवरील वाढता ताण पहाता शहर पोलिस आयुक्तांनी नागरिकांतून विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. विशेष पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य करताना पी -४ खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीच्या मालकांनी शहरातील विविध भागात एसपीओ म्हणून काम केले.

विशेष म्हणजे ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त झाला होता. अशा परिसरात या विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी (एसपीओ ) मोठे योगदान दिले. मग परिसरातील, सोसायट्यातील नागरिकांना दैनंदिन जीवनाश्यक वस्तू पोहच करणे असो की, पोलिसांसोबत बंदोबस्त असो, किंवा गरजू नागरिकांना मदतीचा हात अशी सर्व कामे यांनी केली.
अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेला हा उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सर्व परिक्षेत्रात हाती घेण्यात आला होता.