दौंड बेटवाडी येथे सव्वा लाखाचा देशी दारूचा साठा जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

- Advertisement -

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

दौंड बेटवाडी येथे सव्वा लाखाचा देशी दारूचा साठा जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई
पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी मा.पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, रौफ इनामदार, पोना. सुभाष राऊत, गुरू गायकवाड, पोकॉ. अक्षय जावळे यांचे पथक दिनांक दिनांक ११/०७/२०२० रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत दौंड-पाटस रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना पथकास, दौंड बेटवाडी येथे एका घरामध्ये बेकायदेशीर विक्रीसाठी देशीविदेशी दारूचा साठा असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने दौंड बेटवाडी येथे छापा टाकून इसम नामे संदिप भाऊसो भुजबळ वय ३३ वर्षे रा.बेटवाडी ता.दौंड जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचे घरामध्ये बेकायदा, बिगरपरवाना विक्रीसाठी ठेवलेले देशी दारूचे ५० बॉक्स त्यामध्ये १८० मि.ली. च्या २,४०० बाटल्या कि.रु. १,२४,८००/- (एक लाख चोवीस हजार) असा प्रोव्ही. माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर आरोपी व ताब्यात घेण्यात आलेला मुद्देमाल हा दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. आरोपी विरूध्द मुंबई प्रोव्ही.अॅक्ट कलम ६५(ई) प्रमाणे कारवाई केलेली आहे.

- Advertisement -