दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख
लहान मुलीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पोस्ट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
भोसरी,पुणे – लहान मुलीचे नग्नावस्थेतील फोटो फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या नराधमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुरज जबार चव्हाण ( रा. चुन्नाभट्टी, सिंहगडरोड,गणेशमळा पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक अमरदिप कृष्णा पुजारी यांनी शनिवारी (दि.१८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी सुरज याने आपल्या फेसबुक अकाउंटवर एका लहान मुलीचे नग्नावस्थेतील फोटो पोस्ट केले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -