Home ताज्या बातम्या सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू

सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू

नाशिक : मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटाईझ करताना भडका उडाल्याने नाशिकमधील महिलेचा मृत्यू झाला. आगीचा भडका उडून 90 टक्के भाजलेल्या महिलेने उपचारादरम्यान चार दिवसांनी प्राण सोडले. वीज पुरवठा खंडित झाल्याने रजबीया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाईझ करत होत्या. त्याचवेळी आगीचा भडका उडाला आणि रजबीया शेख भाजल्या, असा दावा केला जात आहे.नाशिक शहरातील वडाळा गावात ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात रजबीया 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.गेल्या सोमवारी म्हणजे 20 जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती. मात्र 24 जुलै रोजी मध्यरात्री नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.