Home शहरे जळगाव शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सीजन बेड साठी २१ हजार रुपये व वृक्षारोपण कार्यक्रम

शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सीजन बेड साठी २१ हजार रुपये व वृक्षारोपण कार्यक्रम


एरंडोल:- तालुका शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयास कायमस्वरूपी ऑक्सिजन पाईप लाईन उभारण्या कामी एकवीस हजार रुपयांचा निधी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील सह शिवसैनिकांचा सोबत सुपूर्त करण्यात आला.


तसेच एरंडोल कोविड सेंटर च्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, पंचायत समिती उप सभापती अनिल महाजन,शहर प्रमुख नगरसेवक कुणाल महाजन.युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील, उप तालुका प्रमुख रविंद्र चौधरी पचांयत समिती सदस्य मोहन भाऊ सोनवणे , चिंतामण पाटील, विजुभाऊ ठाकुर, राजेंद्र अन्ना महाजन,शहर संघटक नितिन बिर्ला. विभाग प्रमुख छोटु मराठे, युवा सेना शहर समन्वयक अमोल भावसार,कुणाल पाटील, कृष्णा ओतारी विभाग प्रमुख सुनील मराठे तुषार शिंपी ,गोविंदा राठोड, बबलू राठोड ,बापु पाटील यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते….