Home शहरे जळगाव कोरोनाच्या सावटाखाली कानबाई उत्सव साजरा, कानुबाई उत्सवाची शासन नियमात परंपरा जोपासली.

कोरोनाच्या सावटाखाली कानबाई उत्सव साजरा, कानुबाई उत्सवाची शासन नियमात परंपरा जोपासली.


एरंडोल:-कानबाई हा खानदेशातील ग्रामदेवतेचा सण आहे. श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतरच्या पहिल्या रविवारी “कानबाई” किंवा ‘कानुबाई’हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा होतो त्यासाठी कोणतीही तिथी बघत नाही.


कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे याबाबत असे सांगण्यात येते की पूर्वी खानांचं राज्य होतं त्याला लोक म्हणायचे तू तुझ्या नावाचे म्हणजे”खान बाई”असे सांगून हिंदुंचा सण साजरा होता. तर काही म्हणतात. “खानदेश म्हणजेच कान्हादेश! ” व कान्हा म्हणजेच श्रीकृष्ण व त्यांनी देवीचा सण साजरा करावा म्हणून कानबाई हे नाव घेतले. अशा वेगवेगळ्या आख्यायिका सांगण्यात येतात.
हा उत्सव प्रामुख्याने खानदेशात सर्व समाजाचे लोक उत्साहाने साजरा करतात या दिवशी खानदेश ग्रामदेवतेची पूजा होते. कानुबाई बरोबर कन्हेर देव काशी देखील विधीवत पूजा होऊन स्थापना होते. याच दिवशी विशेष म्हणजे चनण्याचा स्वयंपाक असतो यात पुरणपोळी खीर गंगाफळ भोपळ्याची भाजी असा थाट असतो.. याच उत्सवात कानुबाईचे नारळ हे पूर्वापार चालत आलेले असते किंवा ते परनुनं आणलेले असते
कानुबाईला विविध अलंकारांनी सुशोभित करून विधिवत पूजा होते रात्री जागरण होते व दुसऱ्या दिवशी वाजत गाजत नदीवर कानुबाईची विधिवत पूजा होऊन विसर्जन होत असते.
परंतु कोरोना सारख्या महामार्गामुळे या उत्सवावर देखील कोरोनाचे सावट जाणवले . लोकांनी कानुबाईची स्थापना करून शासनाच्या नियमांचे पालन करीत परंपरेला खंड पडू दिला नाही. कानुबाई उत्सवाच्या काळात कोरोनाचा येडा पिडा टळु असे लोक प्रार्थना करीत होते…..‌