Home शहरे जळगाव युरिया खतांच्या टंचाई बाबत भा.ज.पा.तर्फे तहसीलदारांना निवेदन

युरिया खतांच्या टंचाई बाबत भा.ज.पा.तर्फे तहसीलदारांना निवेदन

एरंडोल:-एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना युरिया खताचा टंचाईबाबत निवेदन देण्यात आले.
तालुक्यात पावसाची स्थिती चांगली असल्यामुळे पिकांना खताची नितांत आवश्यकता आहे. अशा वेळी व्यापार्‍यांकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे तरी प्रशासनाने ही साखळी शोधून काढावी . शेतकऱ्यांना रांगा लावून देखील युरिया मिळत नाही व हीच खते काळ्या बाजारात विक्री केली जातात युरिया खताची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई त्वरित करावी अशी मागणी केली जात आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाच वर्षानंतर पुन्हा कृत्रिम टंचाईला तोंड द्यावे लागत आहे युरिया खतासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच आहे.

कृत्रिम टंचाई आघाडी सरकारचा पायगुण आहे व कृषी विभाग साठेबाजांवर मेहरबान आहे. तालुक्यातील कृषी विभागाने योग्य ते नियोजन न केल्यामुळे तालुक्यात खतांची जादा विक्री होत आहे. गरज नसताना वाढीव खते घेण्यात बंधन शेतकऱ्यांवर लागते जात आहे यातच शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक मिळून देखील होत आहे याबाबत खतांची कृत्रिम टंचाई व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. सदर निवेदनावर रमेश परदेशी,रवींद्र महाजन अशोक चौधरी राजेंद्र पाटील अमोल जाधव सुनील भैय्या पाटील संजय साळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन देते वेळी रमेश परदेशी नगराध्यक्ष, रवींद्र महाजन माजी नगराध्यक्ष, सुनील भैया पाटील, अशोक भाऊ चौधरी, एस.आर. पाटील, अमोल जाधव, संजय साळी उपस्थित होते.