Home शहरे जळगाव दापोरे येथे किरकोळ कारणावरून एकाचे डोके फोडले

दापोरे येथे किरकोळ कारणावरून एकाचे डोके फोडले

एरंडोल:-तालुक्यातील दापोरे येथे सेंटिंग चे सामान उचलायला सांगितल्याचा राग आल्यामुळे विशाल मधुकर पाटील वय ३२ वर्ष यांना लाकडी दांड्याची लोखंडी पावडी ने डोक्यात मारले व ते गंभीर जखमी झाले ही घटना 31 जुलै रोजी दुपारी १२.३० अंगणात घडली. आरोपींमध्ये निहाल ऋषीराज पाटील, संदीप अशोक पाटील, प्रीतम ऋषीराज पाटील, मंगलाबाई ऋषीराज पाटील, यांचा समावेश आहे.

आरोपीने फिर्यादी विशाल पाटील यांना लाकडी दंडाची लोखंडी पावडी डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले तसेच फिर्यादी विशाल पाटील यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भाग ५ गु.र.न. ४०/२० भा.द.वि. कलम ३२४,५०४,५०६,३४ . दाखल आहे एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, राहुल बैसाणे ,संदीप सातपुते, अखिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.