Home ताज्या बातम्या मनसेच्या दणक्यानंतर अग्रेसन शाळेने रद्द केली परीक्षा – शाळेने दिला माफीनामा

मनसेच्या दणक्यानंतर अग्रेसन शाळेने रद्द केली परीक्षा – शाळेने दिला माफीनामा

पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अग्रेसन हायस्कूल ने आज नियोजित केलेल्या परीक्षा मनसेच्या मागणीची दखल घेत रद्द केल्या,काही पालकांनी काल मनसेच्या महिला सेनेच्या शहर अध्यक्ष  रूपालिताई पाटील व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केली,

याची दखल घेत आज मनसेचे गणेश पाटील(सर),वंदनाताई साळवी(मनसे महिला सेना विभाग अध्यक्ष ),कुलदीप घोडके(मनवीसे विभाग अध्यक्ष  ),सुनील कदम(मनसे सदस्य),श्री किशोर चिंतामणी(मनसे वाहतूक सेना -शहर अध्यक्ष ),महेश शिंदे(मनसे शाखा अद्यक्ष)राम पाटील(शाखा अध्यक्ष ) आदी मनसे पदाधिकारी व पालक प्रतिनिधी,पोलीस अधिकार, यांनी शाळा प्रशासनाशी मनसे स्टाईल चर्चा केली,

व पुढील 5 दिवस होणाऱ्या परीक्षा रद्द करा,अशी मागणी केली,
या मागणीचा तात्काळ विचार करून शाळा प्रशासनाने लेखी मनसेचे राजसाहेब ठाकरे व शहर पक्ष पदाधिकारी तांच्या नावे पत्र दिले,व परीक्षा रद्द करून ओनलाईन परीक्षा घेऊ ,असे लेखी आश्वासन दिले,
यामुळे शाळेचे पालक यांनी मनसेचे आभार व्यक्त केले.