Home शहरे अहमदनगर तडीपार गुंड शहरातच सापडला

तडीपार गुंड शहरातच सापडला

अहमदनगर : तडीपार असताना शहरात नाऱ्या गुंडाला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. टिंग्या उर्फ सुमेद साळवे (रा. गौतमनगर, बालिकाश्रम रोड, नगर) हे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत हकीगत अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनिय माहीती मिळाली कि, टिंग्या उर्फ सुमेद साळवे यास अहमदनगर शहरातून हद्दपार केलेले असतानाही तो बालिकाश्रम भागामध्ये फिरत आहे. त्यावरून पवार यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी मन्सूर सय्यद, रविंद्र कर्डीले, किरण जाधव, संदीप पवार, विनोद मासाळकर, योगेश सातपूते अशांनी मिळून हद्दपार इसमाचा शोध बालिकाश्रम परिसरात शोध घेतला असता हद्दपार टिंग्या उर्फ 
सुमेद किशोर साळवे, हा न्यु आर्टस्, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेजचे पाठीमागील बाजूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास दोन वर्षाचे कालावधी करीता अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सिमेच्या हद्दीमधून हद्दपार करण्यात आलेले असतानाही सदर हद्दपार आदेशाचे भंग करुन अनाधिकाराने अहमदनगर शहरात प्रवेश करुन वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द पोकॉ योगेश अशोक सातपूते यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पो.स्टे. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.