Home गुन्हा राज्यात गुटखा बंदी, पण सर्रासपणे गुटखाविक्री सुरू; अंधेरी चकाला येथे कुरियर सर्विसमधून आलेला बारा लाख रुपयांचा गुटखा जप्त

राज्यात गुटखा बंदी, पण सर्रासपणे गुटखाविक्री सुरू; अंधेरी चकाला येथे कुरियर सर्विसमधून आलेला बारा लाख रुपयांचा गुटखा जप्त

मुंबई : अंधेरी चकाला येथील नंदन कुरियरच्या एका वाहनात गुजरात भावनगर येथून आलेला सुमारे १२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा अन्न व औषध प्रशासन आणि विलेपार्ले पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त केला. काळ्याबाजारात जाणारा गुटखा, एक चारचाकी वाहन व नंदन कुरियरच्या तीन आरोपींना विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले.

नंदन कुरियर सर्व्हिस च्या वाहनांमधून कुरियर पार्सलच्या नावाखाली मुंबईत गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हर्षद पाटील, आदेश शिंदे, रॉबिन चोरघे, प्रथमेश राणे यांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भावनगर येथून लाखों रुपयांचा गुटखा घेऊन आलेला टाटा टेम्पो GJ38 T2273 अंधेरी चकाला येथील नंदन कुरियर च्या ऑफिसमध्ये गुटखा उतरवत असताना रंगेहात पकडला. याची माहिती त्वरित अन्न व औषध प्रशासन यांना देण्यात आली. या वाहनांची अधीक तपासणी केली असता या त्या वाहनात ८ मोठे पोते आरएमडी, राजनीगंधा, तुळसी इत्यादी गुटखा ज्याची बाजारमुल्य १२ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन चालक आणि नंदन कुरियरचे २ मॅनेजर यांना ताब्यात घेऊन विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणले. या गुटखा तस्करी संदर्भात अधीक चौकशी केली असता यामागे मोठा रॅकेट असल्याचे समोर आले आहे. जिथे गुटखा पोचवला जाणार त्याचा पूर्ण पत्ता न टाकता कोडवर्ड वापरला जात आहे. कुरियर चलन वर वेगवेगळ्या गुटख्यांचा उल्लेख तिखट पापड, गोड पापड असा केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिखाऊ कारवाई न करता प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे. रॅकेट मधील सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. नंदन कुरियरच्या मालकाला अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. विलेपार्ले पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल आव्हाळे हे अधिक तपास करीत आहेत.