वर्सोवा पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार राजन विचारे यांच्याकडून पाहणी

- Advertisement -

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई व ठाणे, वसई, मीरा-भाईंदर तसेच उपनगरीय शहरातील महानगरपालिका क्षेत्रात जोडणारा अत्यंत महत्वाचा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील नॅशनल हायवे 48 वर्सोवा येथील नवीन पुलाच्या कामाच्या बांधकामाचे 11 जानेवारी 2018 रोजी  झालेल्या भूमीपूजनानंतरही पर्यावरण विभागाच्या परवानगी मिळाली नसल्याने या पुलाचे बांधकामास प्रत्यक्षात सुरू झाले नव्हते.

या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी मुळे नागरिकांना याचा होणार त्रास कमी व्हावा यासाठी या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक लागणाऱ्या सी आर झेड, कांदळवन, वनखात्याची, सर्व परवानग्या मिळवून घेण्यासाठी झटणारे खासदार राजन विचारे यांनी आज या पुलाच्या बांधकामासाठी सर्व अंतिमपरवानग्या29 एप्रिल 2019 रोजी प्राप्त करून दिल्या होत्या. परंतु हे काम सुरू झाले की नाही याची खातरजमा करण्यासाठी आज या पुलाची पाहणी आमदार प्रताप सरनाईक  व  नॅशनल हायवेचे 48 (सुरत) जनरल मॅनेजर शशीभूषण तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत या पुलाच्या पाहणी दौरा आयोजित केला होता.

या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी सर्वप्रथम बांधकामाचे आराखडे कार्यालयात बसून समजून घेतले. त्यामध्ये त्यांनी या पुलाच्या दोन्ही बाजूचे काम का पूर्ण करण्यास विलंब का लागत आहे. याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून जो पर्यंत पुलाचे काम होत नाही तो पर्यंत या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही मार्गाचे काम सुरु होत नाही अशा तांत्रिक बाबी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. हा प्रकल्प २.२५ किमी. लांबीचा  असून त्यामध्ये या पुलाची लांबी 9१७ मीटरची आहे. हा पूल चार लेनचा असल्याचे समजते. या पुलाच्या बांधकामासाठी 157 कोटीची तरतूद केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचेअधिकाऱ्यांकडून खा. विचारे यांना सांगण्यात आले.

या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक लागणाऱ्या परवानग्या मिळवून घेण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी दिल्लीत पर्यावरण मंत्र्यांची वारंवार भेट घेतली. त्यामध्ये पर्यावरण मंत्री मा. डॉ. हर्षवर्धन यांनी याचे गांभीर्य ओळखून या प्रकल्पासाठी आवश्यक लागणाऱ्या परवानग्या मिळवून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश पारित केले. त्यामुळेच या पुलासाठी लागणारे आवश्यक परवानग्या पर्यावरण विभागाकडून वेळेत प्राप्त झाल्या व या पुलाचे काम सुरु झाले. या ४ लेनच्या नवीन पुलावरून ठाणे व मुंबईकडून अहमदाबाद मार्गास जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच दोन्ही जुने पूल आहेत या पुलावरून मुंबई व ठाणे या दिशेस असणारी मार्गिका राहणार आहेत असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

त्यावेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते हरिचंद्र आमगावकर, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील ,माजी विरोधी पक्ष नेते राजू भोईर, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, शहर संघटक स्नेहा साळवी, विभाग प्रमुख व शाखाप्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -