चित्रपट पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला ; कार उलटून १ ठार, ४ जखमी

- Advertisement -

धुळे :  चित्रपट पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांची कार उलटून एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टीटाणे फाट्याजवळ घडली. अपघातात रोहित पंजाबी याचा मृत्यू झाला असून निखिल वेडू जाधव, कुणाल विक्रम पाटील, नैनेश दिपक सावंत, अपुर्व विजय गवळी (सर्व रा. साक्री, धुळे) हे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चित्रपट पाहण्यासाठी हे सर्वजन कारने नंदूरबारकडे निघाले होते. टीटाणे फाट्याजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. कारचा वेग खूप जास्त असल्याने कार चार पाच वेळा पलटी झाली. यात जखमी झालेल्या पाचही जणांना साक्री येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान रोहित पंजाबी यांचा मृत्यू झाला. रोहित हा साक्री येथील ड्रेस मटेरियल विक्रेत्याचा मुलगा होता. अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. साक्रीतील बाजारपेठ आज बंद राहणार आहे, अशी माहिती शोकाकुल ग्रामस्थांकडून मिळाली आहे.

- Advertisement -