Home गुन्हा ५०,००० रुपयांची लाच स्विकारताना महिला सरकारी वकिल अँटी करप्शनच्या जाळ्यात

५०,००० रुपयांची लाच स्विकारताना महिला सरकारी वकिल अँटी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना मुंबईतील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयातील महिला सहायक सरकारी वकिलाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात अटक केली.

प्रीती राजाराम जगताप (वय ३९, सहायक सरकारी अभियोक्ता, मा. मुख्य महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालय, अंधेरी मुंबई, रा. शासकिय वसाहत, बांद्रा पुर्व, मुंबई) असे पकडण्यात आलेल्या महिला सरकारी वकिलाचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तक्रारदार व फिर्यादी यांच्यात तडजोडीकरता न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी महिला सरकारी वकिल प्रीती जगताप यांनी ५० हजार रुपयांती मागणी केली.त्यानंतर तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यावर त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी पथकाने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.