Home बातम्या दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी आणि नेमार घेणार या कंपनीची करोना लस

दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी आणि नेमार घेणार या कंपनीची करोना लस

0
दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी आणि नेमार घेणार या कंपनीची करोना लस

[ad_1]

नवी दिल्ली: करोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात लस दिली जात आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज खेळाडू देखील लस घेत आहेत. फुटबॉलमधील आघाडीचे खेळाडू असलेल्या लिओनेल मेस्सी आणि नेमार हे आता करोनावरची लस घेणार आहेत.

वाचा- IPL खेळणाऱ्या क्रिकेटपटूवर मोठे संकट, कुटुंबातील १० जणांना करोनाची लागण

दक्षिण अमेरिकेतील प्रादेशिक फुटबॉल फेडरेशनचे कोन्मेबोल यांनी दिलेल्या माहितीनुसार लिओनेल मेस्सी आणि नेमार हे दिग्गज खेळाडू चीनच्या सिनोव्हॅक बायोटेक कंपनीने तयार केलेली करोनाची लस घेणार आहेत. या फुटबॉल फेडरेशनने त्याचे सदस्य असलेल्या १० संघटनांना लस देण्याचे सुरू केले आहे. याद्वारे दक्षिण अमेरिकेतील काही हजार फुटबॉलपटूंना लस दिली जाणार आहे.

वाचा- अभिमानास्पद! IPL खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने करोना रुग्णांना दिले ३० लाख

वाचा- IPL 2021: संघ जिंकला पण या खेळाडूने केला स्पर्धेतील लाजिरवाणा विक्रम

गुरुवारी उरुग्वेची राजधानी मॉन्टेविडीया येथे ५० हजार डोस दिले जाणार आहेत. दक्षिण अमेरिकेतील खेळाडूंना ही लस दिल्यानंतर येथील सर्वात मोठी अशी कोपा अमेरिका या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

वाचा- IPL 2021 मोठी बातमी: डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरून उचलबांगडी

गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये अन्य स्पर्धांप्रमाणेच कोपा अमेरिकेचा ४७वा हंगाम करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आला होता.

[ad_2]

Source link