Home शहरे सोलापूर Pandharpur By Election Result 2021 Live Updates: पंढरपुरात बाजी कोण मारणार?, थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू…

Pandharpur By Election Result 2021 Live Updates: पंढरपुरात बाजी कोण मारणार?, थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू…

0
Pandharpur By Election Result 2021 Live Updates: पंढरपुरात बाजी कोण मारणार?, थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू…

[ad_1]

हायलाइट्स:

  • पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी.
  • कोविड स्थितीमुळे सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश.
  • निकालानंतर मिरवणूक काढण्यास करण्यात आली आहे मनाई.

सोलापूर:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आली आहेत. परिणामी मतमोजणी संथगतीने होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम निकाल यायला रात्रीचे ९ ते १० वाजणार आहेत.

पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके नशीब आजमावत आहेत तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे.

पंढरपूरच्या मतमोजणीचे क्षणाक्षणाचे अपडेट्स येथे जाणून घ्या…

– पोटनिवडणुकीत ५२४ मतदान केंद्रावर २ लाख ३४ हजार मतदारांनी बजावला आहे मतदानाचा हक्क.

– मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिगेटिंग लावून करण्यात आले आहेत बंद.

– शासकीय गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात.

[ad_2]

Source link