Home शहरे मुंबई एसटी महामंडळातील ३० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण

एसटी महामंडळातील ३० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण

0
एसटी महामंडळातील ३० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोना काळात मुंबईतील बेस्ट मार्गावर हजारो गाड्यांनी मुंबईकरांना प्रवास सुविधा देणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळातील ३० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक करूनही एसटीतील करोना बधितांचा टक्का अवघा ८ टक्के असल्याने मुंबईकरांसाठी हे दिलासादायक आहे.

महामंडळात एकूण ९९,५६८ कर्मचारी कार्यरत आहेत. यात ३१ हजार चालक तर ३५ हजार वाहकांचा समावेश आहे. महामंडळातील लसीकरणाचा टक्का ३० टक्क्यांहून अधिक आहे.

अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे लसीकरण विलंबाने सुरू झाले. सध्या १८ ते ४४ वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण ही शक्य तितक्या लवकर करण्याचे प्रयत्न असल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महामंडळातील एकूण करोना बाधितांची संख्या ७५७१पर्यंत पोहोचली आहे. यापैकी ५८५० कर्मचारी योग्य उपचार, संतुलित आहार आणि करोना नियंत्रण करणाऱ्या नियमांचे पालन केल्यामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या १५२५ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

वारसांना मदत

करोनामुळे १९६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यापैकी अनेकांना अन्य गंभीर आजार होते. करोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

लसीकरण झालेले कर्मचारी – ३०,०६८

एकूण करोना बाधित – ७५७१

बरे होऊन घरी गेलेले – ५८५०

उपचार सुरू असलेले – १५२५

मृत्यू झालेले – १९६

एकूण कर्मचारी संख्या – ९९,५६८

(३० एप्रिलपर्यंतची माहिती)

[ad_2]

Source link