Assembly Elections 2021 : पुदुच्चेरीमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार?

Assembly Elections 2021 : पुदुच्चेरीमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार?
- Advertisement -


नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. पुदुच्चेरीमध्ये विधानसभेच्या एकूण ३३ जागा आहेत. यापूर्वी ३० जागांवर निवडणूक होते. तर तीन सदस्यांची नेमणूक केंद्र सरकारपुदुच्चेरीमध्ये एन नारायमसामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं सत्तास्थापना केली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचं सरकार कोसळलं होतं. पुदुच्चेरी विधानसभेच्या ३० जागांसाठी ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. पुदुच्चेरीमध्ये एकूण ८१.८८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय. पुदुच्चेरीत बहुमतासाठी १७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.

LIVE अपडेट

जनमत चाचणीत पुदुच्चेरीची सत्ता काँग्रेसच्या हातातून निसटताना दिसली होती.

पुदुच्चेरीमध्ये एन नारायमसामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं सत्तास्थापना केली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचं सरकार कोसळलं होतं.

केंद्रशासित प्रदेशात एन रंगास्वामी काँग्रेस (AINRC), भाजप (BJP) आणि इतर पक्षांच्या युतीला ३० पैंकी २१ जागा मिळण्याची शक्यता जनमत चाचणीत नोंदवण्यात आली होती.



Source link

- Advertisement -