कारंजा तालुक्यातील भिवरी येथे मागील आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे विजेचे जिवंत तार तुटून जमिनीवर पडलेले आहेत. यामुळे आज गावाशेजारी असलेल्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन गाईला विजेच्या तुटलेल्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
- Advertisement -