ठाणे ग्रामीण भागांत नोंदणीत अडथळे

ठाणे ग्रामीण भागांत नोंदणीत अडथळे
- Advertisement -


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात गुरूवारी १८ ते ४३ वयोगटातील नागरिकांना लसीकरण खुले झाले. ग्रामीण भागांतील केंद्रांमध्ये येण्यासाठी तरुणांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. ग्रामीण भागात ऑनलाइन नोंदणीसाठी मोबाइल रेंजचा अडथळा व इतर कारणांमुळे अडचणी आल्या. त्यामुळे ग्रामीण भागांत ऑनलाइनऐवजी थेट लसीकरणाची सोय करण्याची मागणी केली जात आहे.

ठाण्यातील भिवंडी तालुक्यात दिवा-अंजूर आणि शहापूर तालुक्यातील शेंद्रुण या केंद्रात शनिवारी लसीकरणाचा पहिला दिवस पार पडला. ग्रामीण भागातील या केंद्रांवर येण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करूनच येणाऱ्यां लस दिली जाणार होती. मात्र नेटवर्क रेंजचा अडथळा, नोंदणीबद्दल अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागांतील तरुणांकडून काहीसा थंड प्रतिसाद होता.

ग्रामीण भागांतील शहराशी जोडलेल्या मंडळींनी ऑनलाइन नोंदणी करून पहिल्या दिवशी लसीकरण केले. त्यामध्ये भिवंडीतील दिवा-अंजूर हा शहरी भागाजवळ असल्याने आणि ऑनलाइन नोंदणीचा अडथळा नसल्याने १३९ जणांनी नोंदणी केल्याप्रमाणे लस घेतली तर शहापूर परिसरातील शेंद्रुण केंद्रात दुपारच्या सत्रात ७१ जणांना असे २१० जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या लसीकरणामध्ये शहरी भागांतील युवकांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीचा अडथळा ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रातून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.



Source link

- Advertisement -