हायलाइट्स:
- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजयानंतर ममता बॅनर्जींनी मानले मतदारांचे आभार
- नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात ममतांचा पराभव, भाजपचे सुवेंदू विजयी
- विजयी आघाडीनंतर ममता बॅनर्जींनी मानले मतदारांचे आभार
- विजयी मिरवणुका न काढता घरी जावे, कार्यकर्त्यांना विनंती
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी घोषित करण्यात आले. त्यानुसार सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठी विजयी आघाडी मिळाली आहे. अधिकृत निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मागच्या निवडणुकांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवल्याचे सध्या तरी चित्र आहे. दोनशेहून अधिक जागांवर विजयी आघाडी मिळाली आहे. तर भाजप ७५ जागांवर आघाडीवर आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष होते. या सर्वात प्रतिष्ठेच्या अशा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
नंदीग्राममध्ये तृणमूल काँग्रेसकडून स्वतः ममता बॅनर्जी निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. तर त्यांच्याविरोधात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढवली. अधिकारी यांनी निवडणुकांच्या काही दिवस आधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. रविवारी मतमोजणी झाली. त्यावेळी दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, अखेरच्या फेरीपर्यंत चुरस वाढली होती. अखेर ममता बॅनर्जी पराभूत झाल्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विजयी झाला आहे. मी सर्वांना धन्यवाद देते. कुणीही विजयी मिरवणूक काढू नये, अशी विनंती करते. सर्वांनी आपापल्या घरी शांतपणे जावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.