Home शहरे मुंबई फ्लेमिंगोंचे पुन्हा स्वागत

फ्लेमिंगोंचे पुन्हा स्वागत

0
फ्लेमिंगोंचे पुन्हा स्वागत

[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी,

परिसरात दरवर्षी दिसणारे गेले २ महिने अजिबात दिसले नव्हते. मोठ्या भरतीच्या वेळी ठाणे खाडे परिसरातून हे पक्षी फ्लेमिंगो अभयारण्याचा भाग असलेल्या भांडुप पंपिंग स्टेशन परिसरातील तळ्यांमध्ये येतात आणि ओहोटी सुरू झाल्यावर परत जातात. मात्र यंदा ते न आल्याने यामागील कारणांचा शोध सुरू झाला आणि पंपिंग स्टेशनमधील शैवाल फ्लेमिंगोंना या परिसरापासून दूर ठेवत असल्याचे स्थानिक पर्यावरणावादी कार्यकर्त्यांना लक्षात आले. ही अडचण दूर केल्यानंतर फ्लेमिंगोंनी पुन्हा भरतीच्या वेळी या परिसराकडे मुक्काम वळवला आहे.

ठाणे खाडीमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. मात्र अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या भांडुप पंपिंग स्टेशन परिसरामध्ये मात्र यांचे दर्शन होत नसल्याचे पक्षी निरीक्षकांच्या लक्षात आले. सुमारे २ महिने हे निरीक्षण केल्यानंतर २ दिवसांपूर्वी गुरुवारी आणि शुक्रवारी या परिसरातील तळ्यांमध्ये बोटीच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली, येथील साचलेले पाणी गेट उघडून सोडून देण्यात आले आणि त्यानंतर गेल्या आठवडाअखेरीस पुन्हा एकदा फ्लेमिंगोंनी या परिसराला भेट दिली.

स्थानिक पर्यावरणावादी कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी सांगितले की काही स्थानिक मच्छिमार भरतीचे पाणी तळ्यात आले की तळ्याचे गेट बंद करून घेतात ते परत उघडत नाहीत. वास्तविक ओहोटीनंतर हे गेट उघडणे गरजेचे असते. भरतीसोबत तळ्यामध्ये मासे येतात. त्या माशांच्या उत्पत्तीसाठी हे गेट बंद करून घेतले जाते. भांडुप पंपिंग स्टेशन परिसरातून ट्रक भरून मासे विक्रीसाठी जातात. हा परिसर आता अभयारण्याचा भाग असल्याने मासेमारीस परवानगी नाही. माशांसाठी गेट बंद करून ठेवल्याने या तळ्यांमध्ये पाणी साचून राहिले व त्यावर शैवाल निर्माण झाले. या पाण्याला वासही येत होता. फ्लेमिंगोंनी त्यामुळे या परिसराकडे पाठ फिरवली होती.

निर्बंध पाळणे आवश्यक

फ्लेमिंगोंना खाण्यासाठी पाणथळ, खाजण जमीन मिळणे आवश्यक असते. गुरुवारी आणि शुक्रवारी खारफुटी विभागाच्या आणि ठाणे फ्लेमिंगो अभयारण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा परिसर स्वच्छ करण्यात आला. या परिसरामध्ये पूर्वी फ्लेमिंगोची शिकारही व्हायची. या सगळ्यावर अभयारण्याच्या हद्दीमुळे निर्बंध आले आहेत. हे निर्बंध पाळले गेले तर हा परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित ठरेल याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

[ad_2]

Source link