नवी दिल्ली : सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देणार आहे, जेणे करुन लोक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल. TATA Tigor EV या इलेक्ट्रिक कारला टाटा भारतात लॉन्च केले आहे. आणि ही XM आणि XT या व्हरायटीमध्ये उपलब्ध करु देण्यात येईल. याची किंमत क्रमश: ९.९९ लाख रुपये आणि १०.९ लाख रुपये असेल.
१.६२ लाखाची सबसिडी –
Tigor EV ला सध्या फ्लीट ऑपरेटर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे आणि FAME सब्सिडी केवळ त्या वाहनावर असेल जे पब्लिक ट्रांसपोर्टसाठी वापरण्यात येतील आणि कमर्शिअल वापरासाठी रजिस्टर असतील. Tigor EV ला FAME इंडिया स्कीम फेड -II च्या अंतर्गत १.६२ लाख रुपये सरकारी इन्सेंटिव देण्यात आला आहे.
Tigor EV ला १६.२ kWh बॅटरी देण्यात आल्या आहेत, जे ७२ v, ३ – फेज AC इंडक्शन मोटर द्वारे ४१ hp चे पॉवर आणि १०५ Nm चा टॉर्क जनरेट करेल. Tigor EV ला स्टॅडर्ड वॉल सॉकेट मधून ६ तासात ८० टक्के चार्ज करता येईल. तर कंपनीचा दावा आहे की DC १५ kW फास्ट चार्जरने हेच काम ९० मिनिटात होईल.
टाटाचा दावा आहे की ही कार एकाच चार्जींग मध्ये १४२ km पर्यंत चालवली जाऊ शकते. कंपनी या इलेक्ट्रिक कार बरोबर बॅटरी पॅक बरोबर थ्री-इयर/ १.२५ लाख किलोमीटरची वारंटी देण्यात येत आहे.